दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन देण्याचे निर्देश

पूर्व विदर्भ

चंद्रपूर : कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार [ Minister Vijay Vadettiwar ] यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात  कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लि. व  बरांज कोल माईन्स [ COAL MINES ] येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुलचे उपविभागीय अधिकारी श्री.खेडकर, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन देण्याचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केपीसीएलकडे खाण सुरू झाल्यापासून कामगारांचे 21 महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यापैकी कामगारांना दिवाळीपूर्वी 4 महिन्याचे वेतन देण्याचे करावे व उर्वरित 6 महिन्याचे वेतन डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात यावे. व शिल्लक राहिलेल्या 11 महिन्याचे वेतन किमान वेतन ठरविल्यानंतर देण्यात यावे. कामगारांना वेतन न दिल्यास खाणीचे कामकाज बंद करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी  दिल्या.

मुलांच्या कौशल्य विकासासाठी यापुढे मोठ्या स्वरूपात उपक्रम

महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व  गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे पट्टे वाटप करून देण्यासंदर्भात  पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. जमिनीचे पैसे भरून मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही तातडीने करावी. व माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमिनीचे पट्टे तातडीने वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *