Edu Alert : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात विद्यापीठांमध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू

शिक्षण

KONKAN : येत्या शैक्षणिक  वर्षापासून राज्यात विद्यापीठांमध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.

रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या जलकार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबवण्यात येईल, असंही ते म्हणाले.

पाणी वापर संस्था व जलदूतांची नेमणूक करून वर्षअखेरीपूर्वी जलपुरुष राजेंद्रसिंह राणा व जलनायक किशोर धारिया यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठात बैठक घेऊ, अशी घोषणाही  सामंत यांनी  केली.  जलपुरुष राजेंद्रसिंह म्हणाले की, हवामानबदल आणि पाण्याचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. नाही तर महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. शेतीला पाण्याशी जोडलं जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे. राज्यात पाण्याच्या दक्षतेविषयी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *