ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन

पश्चिम महाराष्ट्र
PUNE : संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त काळ कार्यरत असलेले आणि गाणाऱ्या व्हायोलीनचे जन्मदाते म्हणून प्रख्यात असलेले प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते.

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल ६० वर्षांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत आणि भावसंगीतातही मोलाचे योगदान दिले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात सव्वा रुपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्याबरोबर गीतरामायणाच्या ५०० कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.

पुरस्कार असे…
-महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१५)
-कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला सूरसिंगार पुरस्कार
-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्कार
– २०१७ साली गदिमा पुरस्कार
– पुण्याच्या भारत गायन समाजाच्या वतीने वसुंधरा पंडित पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *