माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक, राज्यातील राजकारण तापणार

राजधानी मुंबई

मुंबई, 2 नोव्हेंबर : कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाºयांनी अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर काल मध्यरात्रीनंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. [ FORMER MINISTER ANIL DESHMUKH ARRESTED BY ED ]

अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते.

दरम्यान, सध्याच्या घडीला त्यांची जे जे रुग्णालयात आरोग्य तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *