आता काय गाडीमध्ये पाणी टाकावं काय, पेट्रोल दरवाढीबद्दल नागपुरात संताप

उपराजधानी नागपूर

नागपूर : 2 नोव्हेंबर
आता काय गाडीमध्ये पाणी टाकावं काय, अशा प्रतिक्रिया नागपुरात पेट्रोल दरवाढीबद्दल व्यक्त होत आहे. शहरातील दरात आज मंगळवारी 35 पैशांची वाढ झाली असून, एका भाजीव्यावसायिकाने केलेला हा संताप प्रातिनिधिक असला तरी त्यावर विचार होणे गरजेचे आहे. [ PETROL HIKE PRICE IN NAGPUR ] 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी मोठी उंची गाठली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पुन्हा पेट्रोलच्या किमतींमध्ये 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढत असताना आता इंधनाच्या किमतींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. अशातच आज नागपुरातील पेट्रोलचा दर 115 रुपयांच्या वर आहे. या मुद्यावर काही वाहनचालकांशी संवाद साधला असता त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे दररोज व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाºया अनेकांच्या समोर पेट्रोलवाढ ही भयानक समस्या निर्माण झाली आहे.

चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवरून नेताना ‘हा’ नियम पाळावाच लागणार

सर्वसामान्यांना दुचाकी हेच साधन सोयीचे पडत असल्यामुळे चीड व्यक्त होणे साहजिकच आहे. स्थानिक मेडिकल चौकात एका दुचाकीस्वाराला याबाबत विचारले असता, त्याने आता आता वाहनात पेट्रोलच्या बदल्यात पाणी टाकावे काय, असा प्रश्न उपस्थित केला़ अर्थात यातून मोठा संताप व्यक्त होत असल्याचे अनुभवास आले.

कंबरमोड…तोड
पेट्रोलियम पदार्थांनी देशभरातील लोकांची कंबरमोड…तोड केली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115.85 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 110.49 आणि डिझेल 101.56 रुपये प्रतिलिटर आहे. याव्यतिरिक्त तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.66 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 110.04 रुपये आणि डिझेलची किंमत 98.24 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *