दिवाळी पाण्यात जाणार, पुढील पाच दिवस दमदार पावसाची शक्यता

पर्यावरण
  • 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार

पुणे : 2 नोव्हेंबर
वर्षातील शेवटचा मोठा सण दिवाळीचा आज दुसरा दिवस असतानाच पुढील पाच दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे़ त्यामुळे हा दीपोत्सव पावसात साजरा करण्याची वेळ आली आहे. [ RAIN WILL BE WASHED DIWALI FESTIVAL] 

यंदाच्या पावसाळा परतीला लागल्याची बातमी असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार वापसी केली आहे. सोमवारी कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवार सकाळपासूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शिवाय पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आता काय गाडीमध्ये पाणी टाकावं काय, पेट्रोल दरवाढीबद्दल नागपुरात संताप

भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आकाशात विजा चमकत असताना लांबचा प्रवास टाळावा आणि मोठ्या झाड्याच्या आडोशाला थांबू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत बुधवारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. याठिकाणी शनिवार पर्र्यत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारनंतर राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे.

दरम्यान, अनेकजण दिवाळी सणाच्या दिवसात बाहेरगावी वा पर्यटनाच्यानिमित्ताने अन्यत्र जात असतात. त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *