पश्चिम बंगालमध्ये चार जागांच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तृणमूल काँग्रेसचीच बाजी

राजकारण

LOKSABHA AND VIDHANSABHA BYE-POLL 2021 : विधानसभेच्या २९ आणि लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेक जागांवर स्थानिक पक्षांची सरशी झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली असून, या चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारांवर विजय मिळवला आहे.

विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांना यश मिळाले आहे. मेघालयात झालेल्या पोटनिवडणुकीत मेघालय लोकशाही आघाडीला यश मिळाले.

नॅशनल पीपल्स पार्टीने मावरींकेंग येथे तर आघाडीच्या उमेदवाराने राजाबाला विधानसभेच्या जागांवर विजय मिळवला. या दोन्ही जागा आधी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. राजबाला मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार हसीना यासमीन मोंडल यांचा 1 हजार 927 मतांनी पराभव झाला. मिझोरममध्ये टुरिअल विधानसभा पोटनिवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार लालडोंगलियाना यांनी झोरम पीपल्स पाटीचे लाल्तलानमाविया यांचा 1 हजार 284 मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील एका जागेवर सत्ताधारी महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *