गोव्यात पेट्रोल 12 रुपये आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त, पाहा कसे …

राष्ट्रीय

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर
गोवा सरकार आपल्या राज्यात पेट्रोल 12 रुपये आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त केले आहे. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात करत आपल्या सरकारने पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी प्रतिलिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. [ Union Government Reduce Excise Duty on Petrol and Diesel ] त्यामुळे दररोज 35 पैशांनी वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. कमी झालेले दर गुरुवारपासून लागू असतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. पेट्रोलवरील एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरीलएक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्याने किंमती उतरल्या आहेत. यानंतर राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरच्या VAT करात कपात करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती. त्यामुळे सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशात पेट्रोलने शंभरी गाठली असतानाच अनेक ठिकाणी डिझेलनेही शंभरी पार केल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *