धूम्रपानाबाबत ‘हा’ असतो मोठ्ठा गैरसमज

ब्लॉग

आपली प्रकृती निरोगी राहिली तरच आपली मनस्थितीही चांगली राहते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात येते. अनेक वाईट व्यसने आणि सवयीमुळे आपले व्यक्तीमत्व डागाळत असते. धूम्रपान या व्यसनाचा दुष्परिणाम आल्या शरीरावर,मनावर होत असतो. त्यामुळे आपले व्यक्तीमत्व कमकुवत होते. म्हणूनच पक्का निर्धार करून व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.                 [  SMOKING CAUSES DEATH UPTO 60 YEARS ]

प्रामुख्याने हृदयरोग जडण्याची प्रमुख कारणे-कॉलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान अशी सांगण्यात येते. एका सर्वेक्षणानुसार, धूम्रपान करणाºया व्यक्तपैकी ४० टक्के लोक आपल्या वयाची ६० वर्षे गाठतागाठताच या जगाचा निरोप घेत असतात.

वैज्ञानिक अभ्यासात धूम्रपानामुळे आपल्या शरीरावर अनेक घातक परिणाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. हे परिणाम धूम्रपान करणाºया व्यक्त ीच्या शरीरावर होतातच, शिवाय त्यांच्या जवळपास राहणाºया व्यक्तीनाही ते भोगावे लागतात. आपल्या देशात ६५ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला कोणत्या न कोणत्या रुपात धूम्रपान करत असल्याचे दिसून येते. यात विडी,सिगारेट,चिलीम इत्यादी आहेत.

एक गैरसमज
धूम्रपान करणाºया लोकांमध्ये धूम्रपान केल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, असा हा गैरसमज रुजला आहे. वस्तुस्थिती मात्र याउलट असते. यातून कोणताही तणाव दूर होत नाही, तर यातून मनुष्य मृत्यूच्या दिशेने निघालेला असतो. धुरामध्ये निकोटीन टार, कार्बन मोनोआॅक्साईड इ.घटक माणसाच्या मनावर आणि शरीरावर दुष्परिणाम घडवत असतात.

तंबाखूतील निकोटीन नावाच्या रसायनामुळे माणूस धूम्रपानाच्या आहारी जातो. त्याचे त्याला व्यसन जडते. मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. विशेषत: पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांना धूम्रपानाचे व्यसन लागल्यास ते सुटणे अवघड असते. ज्या कुटुंबातील आई- वडील सिगारेट ओढतात, त्यांची मुलेही लहान वयातच धूम्रपानाचे व्यसनी होतात. धूम्रपानामुळे हृदयवकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. तंबाखूतील निकोटीन रक्तात तत्काळ मिसळून जाते. त्यामुळे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हृदयाचे स्पंदन अधिक वेगात होते आणि हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता वाढते.

दिवाळी उत्सव काळातील नकली मिठाईपासून सावध राहा, सरकारने दिला भेसळीचा इशारा

दुसरीकडे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्ये जास्त उत्साह असतो. त्यामुळे धूम्रपानावर नियंत्रण ठेवण्यासाठी दृढ नश्चय आवश्यक असतो. मी धूम्रपान करणार नाही, असा पक्का निश्चय करणे आणि त्याचे पालन करणे स्वत:सह समाजासाठी नितांत जरुरीचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *