पेट्रोल महागच,  ग्राहकांचे कंबरडे मोडलेलेच …

राष्ट्रीय

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर
केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी प्रतिलिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. असे असले तरी हे दोन्ही तेल इंधन पेट्रोल महागच असून, ग्राहकांचे कंबरडे अद्यापही मोडलेलेच असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे राजकारणी मात्र आपल्या विरोधकांवर कुरघोडी करत आहेत. [ Petrol-Diesel Price Today 5th November 2021] 

केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी प्रतिलिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे दररोज 35 पैशांनी वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. कमी झालेले दर गुरुवारपासून लागू असतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. पेट्रोलवरील एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरील एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्याने किंमती उतरल्या आहेत. यानंतर राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरच्या श्अळ करात कपात करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

नागपुरात आज शुक्रवारी पेट्रोलचा दर 109.68 रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

अशात गोवा सरकारने आपल्या राज्यात पेट्रोल 12 रुपये आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त केले आहे. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात करत आपल्या सरकारने पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती. त्यामुळे सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशात पेट्रोलने शंभरी गाठली असतानाच अनेक ठिकाणी डिझेलनेही शंभरी पार केल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *