इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात मराठीतले ५ चित्रपट

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

IFFI 52 GOA : गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागात एकूण 25 चित्रपट आणि 20 लघुपट दाखवले जाणार आहेत.

फीचर फिल्म विभागाचं उद्घाटन “सेमखोर” या ‘दिमास’ भाषेतल्या चित्रपटाने होईल. चीन- तिबेट परिसरात बोलली जाणारी ही भाषा ईशान्य भारतातल्या ‘गारो’ या भाषेबरोबर साधर्म्य सांगणारी असून या चित्रपटाचं दिग्दर्शन अमी बारुआ यांचं आहे.

पेट्रोल महागच,  ग्राहकांचे कंबरडे मोडलेलेच …

या विभागात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित “मी वसंतराव”, अनंत महादेवनचा “बिटरस्वीट”, निखिल महाजनचा “गोदावरी”, विवेक दुबेचा “फ्युनरल” आणि मेहुल अगाजाचा “निवास” अशा 5 मराठी चित्रपटांची वर्णी लागली आहे. राजीव प्रकाश दिग्दर्शित “वेद – द व्हिजनरी” या लघुपटाने नॉन फीचर विभागाचं उद्घाटन होईल. या विभागात सोहिल वैद्य दिग्दर्शित ” मर्मर्स ऑफ दि जंगल” हा मराठी लघुपट दाखवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *