कमी लसीकरणामुळे युरोप खंडात कोरोनाग्रस्तांंच्या संख्येत मोठी वाढ : डब्ल्यूएचओ

आंतरराष्ट्रीय बातम्या

CORONA CRISIS IN EUROPE : युरोप खंडात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लसीकरण कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात युरोपला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे प्रमुख हंस क्लज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की फेब्रुवारीपर्यंत युरोपातील या देशांमध्ये ५ लाख लोकांचे मृत्यू ओढावू शकतात. कोविड- १९ संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करण्यात शिथिलता आल्याने देखील यात वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यात युरोपातील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण घसरले आहे. स्पेनमध्ये ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर जर्मनीमध्ये हे प्रमाण ६६ टक्के आहे. रशियामध्ये केवळ ३२ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *