सोयाबीन, पामतेल स्वस्त : कच्च्या तेलावरच्या करांमध्ये कपात

पीक शिवार

OIL PRICE : गेल्या वर्षापासून खाद्य तेलाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावरच्या करांमध्ये कपात केली आहे.

सरकारने मूलभूत कर रद्द केला आहे. तर, पाम तेलावरचा कृषीअधिभार २० टक्क्यांवरून साडेसात टक्के केला आहे. सोयाबीन आणि सुर्यफुलाच्या तेलावरचा कृषी अधिभार पाच टक्के केला आहे.

रिफाइन्ड तेलावरचा  मूलभूत कर साडेबत्तीस ट्क्क्यावरून साडेसतरा टक्के केला आहे. या कपातीमुळे कच्च्या पामतेलावरचा कर सव्वाआठ टक्के तर, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरचा कर साडेपाच टक्के राहिल. खाद्य तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने या तिन्ही तेलांवरच्या आयात करांवरचे सुसूत्रीकरण केले आहे, एनसीडीईएक्सने मोहरीच्या तेलाचे वायदेव्यवहार थांबवले आहेत, तसंच साठ्यांवर मर्यादा आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *