राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

राजधानी मुंबई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख [ FORMER MINISTER ANIL DESHMUKH ] यांना मुंबई न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

देशमुख यांना अजून ९ दिवसांची ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. मात्र ही मागणी फेटाळत न्यायालयाने देशमुख यांना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान देशमुख यांचे पुत्र पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीनावरची सुनावणी या महिन्याच्या १२ तारखे पर्यंत पुढे ढकलायचा निर्णय सत्र न्यायालयाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *