पहिल्या जैववैद्यकीय संशोधक डॉ. कमल जयसिंग रणदिवे

अनुपमा... महिला विश्व

आजच्या काळात महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. विशेषत: भारतात अनेक दशकांपूर्वी महिलांना घरोघरी केवळ घरातच राहण्यास बाध्य केले जात होते़ आजच्या काळात त्या घरातील कामे, व्यवसाय आणि नोकरी अशा गोष्टी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत; परंतु भारतात याची सुरुवात कुणी केली? महिलांची सद्यस्थिती म्हणजेच उंची ही अनेक महिलांनी सुरू केली होती, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. कमल जयसिंग रणदिवे.

कमल रणदिवे यांनी सुरुवातीच्या काळात कर्करोगावर अनेक संशोधन केले. खरे तर, स्तनाचा कर्करोग आणि आनुवंशिकता यांच्यातील दुवा मांडणाºया पहिल्या जैववैद्यकीय तज्ज्ञ होत्या. नंतर अनेक संशोधकांनीही त्याची पुष्टी केली. सुदैवाने कमल यांचा जन्म अशा घरात झाला जिथे पुरुषांनी मुलींना शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे चुकीचे मानले नव्हते. त्यांचे वडील दिनकर हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. घरातील सर्व मुलांना, विशेषत: मुलींना उत्तम शिक्षण मिळावे, यावर त्यांचा कटाक्ष होता.

KAVYABHILASHA : सांगा, मानू कशी दिवाळी?

कमल यांचा जन्म पुण्यात 8 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. त्या आपल्या वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे शैक्षणिक आयुष्य जगल्या. आयुष्यातील प्रत्येक परीक्षा त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. कमल नेहमी काहीतरी नवीन शिकायची आणि त्यात चांगली कामगिरी करून दाखवायची. मुलीचे मन पाहून तिच्या वडिलांची इच्छा होती की कमलने डॉक्टर व्हावे आणि तिचे लग्नही डॉक्टरांशी व्हावे़ कमलने तो मार्ग निवडला नाही़ त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे शिक्षण घेतले. त्या ‘इंडियन असोसिएशन आॅफ वूमन सायंटिस्ट्स’च्या प्रमुख संस्थापक सदस्या होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज 8 नोव्हेंबर 2021 रोजी डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांच्या जन्मदिनानिमित्त गूगलने डूडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *