पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामांची पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, 8 नोव्हेंबर
पंढरपूरला जाणाºया यात्रेकरूंचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आणि महामार्ग क्रमांक ९६५-जी वर एकूण आठ ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या कामाच्या कोनाशिलेचे उद्धाटन करणार आहेत. आषाढी वारीसाठी किंवा कार्तिकी एकादशीला आळंदी आणि देहू मधून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गातून दोन्ही बाजूस पालखीकरिता समर्पित असे पदपथ बांधले जाणार आहेत.

दिवेघाट ते मोहोळ २२१ किलोमीटर आणि पाटस ते तोंडाळे या १३० किलोमीटरच्या टप्प्याचा यात समावेश आहे. त्यासाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार असल्याची माहिती आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा [ PANDHARPUR PALAKHI MARG ] हा मार्ग असून, चौपदरीकरणाबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूला यात्रेकरूंच्या सुरक्षित मार्गक्रमणासाठी वेगळी मार्गिका बांधली जाणार आहे. पंढरपूरबरोबरचा संपर्क सुधारण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात आलेल्या २२३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या तसेच १८० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते दुरुस्ती विकास कामांचे भूमिपूजन करतील.

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *