राज्यात संपावर गेलेल्या एसटी महामंडळाच्या ४५ आगारांमधील ३७६ कर्मचारी निलंबित

राजधानी मुंबई
MUMBAI CAPITAL : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू
ठेवल्याने महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. महामंडळाने  एकूण १६ विभागांत ४५ आगांरांमधल्या ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
ऐन दिवाळीत सुरू केलेल्या या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली शिवाय महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. महामंडळाने आंदोलनकर्त्यांना वारंवार संप मागे घ्यावा, असे आवाहन केले. तरीही संप महामंडळाने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्देशांनुसार कामगारांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने  राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली. समितीमध्ये कुंटे यांच्यासह परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *