अहमदनगर रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक

पश्चिम महाराष्ट्र

AHMADNAGAR HOSPITAL FIRE : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अहमदनगर पोलिसानी चार जणांना अटक केली.

आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांचा समावेश आहे.वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे,परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.

यापैकी  शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं दिला आहे. शनिवारी लागलेल्या या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *