Tapori Turaki …..Jocks for You ….. नळीवरचा पाय काढ, शिंच्या…

टपोरी टुरकी ....Jocks for You

वर्ग अर्थातच बंड्याचा…
मास्तरनं मोठी हिम्मत करून इंग्रजीच्या तासाला बंड्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल?
बन्या : सर, मी सांगतो़ ( एकदम उसळून बंड्या बोलला. त्यानं एकदम बाह्या सरकवल्या. अगदी हातवारे करून.)…सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की़ आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल!
…असं म्हणतात की बंड्याचा मास्तर असूनही सायकलवर गावोगांव फिरतच आहे.

***

चिंकी : आमच्या कॉलेजमधली मुलं माझ्या एका एका श्वासावर
मरतात…
.
.
.
.
.
बंटी : मग तू चांगली टूथपेस्ट का नाही वापरत?

***

नवरा थकलेला आणि रागात आॅफिसमधून घरी आलेला असतो…
नवरा : प्यायला पाणी आणं गं.
बायको : तहान लागली आहे का ?
.
.
.

नवरा (संतापून) : नाही, माझा गळा कुठून गळतोय, ते
तपासून घेतो.

***

वडिलांनी मुलाला सांगितला ‘परीक्षा’ शब्दाचा नवीन अर्थ.
मन लावून अभ्यास करून परीक्षा दिलीस तर… कदाचित परी मिळेल…नाहीतर रिक्षा आहेच…
पोरगं अभ्यासाला लागलं!

***
बंड्या : ओ बाबा, ही बघा माझी चड्डी. मी स्वत: धुतली आहे. …कशी आहे?
बाबा : अरे व्वा छान, स्वच्छ धुतली आहेस रे…
बंड्या : बरं, मग मला मित्रांसोबत वीकेंडला गोव्याला जायचंय.
बाबा : आँ…त्याचा काय संबंध इथं?
बंड्या : नाही, तुमच्याकडे दरवेळी कसलीही परवानगी मागितली तर म्हणता, तुला स्वत:ची चड्डी धुवायची अक्कल नाही. आणि म्हणूनच आज धुवून आलोय.

***

पुण्याच्या एका लग्नसमारंभात एक पाहुणा दुसºया पाहुण्याला विचारतो.
पहिला : हे काय , त्यांनी जेवणाच्या काउंटरवर डिजिटल सेवा सुरू केली आहे.
दुसरा : हो , बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल, त्याबरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. मग तो ओटीपी तुम्ही जेवणाच्या काऊंटरवर दाखविला, की तुम्हाला जेवण मिळेल.

***

मित्राला भेटायला संज्या हॉस्पिटलमध्ये गेला.
मित्राशेजारच्या कॉटवरील एका चिनी पेशंटनं त्याला अचानक, चिंग चँग चुंग, चिन चॅन चू, असं म्हणत तडफडून प्राण सोडला.
संज्यानं विचार केला, त्या चिन्यानं मरण्यापूर्वी काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगितलं असलं पाहिजे.
.
.
.
.
म्हणून तो ग्रंथालयात गेला आणि त्या वाक्याचा अर्थ शोधून काढला.
तो अर्थ असा होता, आॅक्सिजनच्या नळीवरचा पाय काढ, शिंच्या…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *