Nov 12, 2021 , 4:59PM कृषी सहाय्यक पदाच्या 47 जागांसाठी 14 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार

रोजगार

AGRICULTURE ASSISTANT EXAMINITION : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या 47 जागांसाठी 14 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे.

परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अंदाजे सहा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे बसगाड्या बंद आहेत. रेल्वेच्याही मर्यादित फेऱ्या सुरू असल्यामुळे हजारो विद्यार्थी कृषी विद्यापीठातील जागांच्या परीक्षेला मुकणार आहेत. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखडे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी राज्यपाल गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *