नवी दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी महोत्सव

राष्ट्रीय
  • प्रधानमंत्री सोमवारी जनजाती गौरव दिन सोहोळ्याचं नेतृत्व करणार
NATIONAL CAPITAL : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा सोमवारी जनजाती गौरव दिन सोहोळ्याचं नेतृत्व करणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी येणारी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभर जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

सोमवारी प्रधानमंत्री मोदी बिरसा मुंडा यांच्या संसद भवनातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर झारखंडमधील रांची इथल्या बिरसा मुंडा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करतील. त्यानंतर प्रधानमंत्री भोपाळ इथं अधिकृतपणे जनजाती गौरव दिवसाचं उद्घाटन करतील ज्यामध्ये २ लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली.

केंद्र सरकारनं आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि यशाचं स्मरण करण्यासाठी १५ नोव्हेंबरपासून आठवडाभर उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. या कालावधीत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून, याउत्सवाचा एक भाग म्हणून, राज्य सरकारांसोबत संयुक्तपणे अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचं कर्तृत्व,शिक्षण, आरोग्य, उपजीविका, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासात सरकारनं केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे.

याशिवाय मंगळवारपासून नवी दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आला असून, आदिवासी उत्पादनं, आदिवासी कला आणि त्यांची संस्कृती यांना व्यासपीठ प्रदान करण्यात आलं आहे, असंही अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *