file photo

गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार

पूर्व विदर्भ
गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत [ GREAT ATTACK ON NAXALI GROUP ] २६ नक्षलवादी ठार झाले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. गेल्या ३ वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भामरागड तालुक्यात ४० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते.

कोरची तालुक्याअंतर्गतच्या ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी मरदिनटोला जंगल परिसरात आज सकाळच्या सुमाराला ही चकमक झाली. [ ATTACK AGAINST NAXALI IN GADCHIROLI ] या परिसरात टिप्पागड, कोरची दलम आणि कंपनी क्रमांक ४ च्या नक्षलवाद्यांचं शिबिर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीसांनी काल रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली होती. शोध मोहीम सुरु असतानाच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीसांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्याला पोलीसांनीही चोख प्रत्यूत्तर दिलं. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र ठार झालेल्यांमध्ये, नक्षल दलमचा मोठा नेता असू शकतो, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे, असं गोयल यांनी म्हटले आहे.
याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्र आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यादृष्टीनं जवानांचा फौजफाटा वाढवून शोधमोहीम तीव्र केली असल्याचं त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे [  ADDITIONAL POLICE SUPERITENDENT SOMEY MUNDE ] आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.  यात  चार जवानही जखमी झाले. या सगळ्यांना उपचारासाठी  नागपूर येथे हलवल्याची माहिती गोयल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *