शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश, इतिहासप्रेमींमध्ये शोक

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, 15 नोव्हेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे इतिहासकार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले आहे. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शंभर वर्षे पूर्ण केले होते.

माहितीनुसार, बाबासाहेब पुरंदरे यांंना न्यूमोनिया झाला होता. तसेच, ते काही दिवसांपूर्वी घरात पडल्याने डोक्याला मार लागला होता त्यानंतर दीनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला.

बाबासाहेब पुरंदरे अर्थात बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला होता. पुण्यात त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करत प्रगाढ ज्ञान प्राप्त केले.

बाबासाहेब पुरंदरेंविषयी संक्षिप्त
– छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहोचवले
– ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन
– जाणता राजा या महानाट्याचे हजारो प्रयोग
– नाटकाचे एकूण ५ भाषांमध्ये भाषांतर
– महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान (2015)
– 2019 मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *