राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी

पश्चिम महाराष्ट्र

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं [ NATIONAL TALENT EXAMINITION ] आयोजन 16 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. एनटीएस परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. या परीक्षेसाठी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात C या परीक्षेसंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थी 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी  https://www.ntsemsce.in/ या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 7 डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क तर 8 ते 13 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज सादर करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *