शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला

राजधानी मुंबई

SHEENA BORA MURDER CASE : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.  2017 पासून इंद्राणीने जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता.

न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. हा जामीन अर्ज कोणत्याही विशेष अथवा वैद्यकीय करणासाठी नसून निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आला होता. यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आपण याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नसल्याचं सागंत ही याचिका फेटाळण्यापूर्वी ती मागे घेण्याची संधीही इंद्राणी मुखर्जीला [ 50 वर्षे ] दिली होती. मुलगी शीनाची हत्या आणि मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात इतर सह आरोपींसोबत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट करत सीबीआयने जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 16 जानेवारी 2022 रोजी

इंद्राणी मुखर्जी मागील सहा वर्षांपासून तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदार आजवर तपासून झाले आहेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

कधीकाळी श्रीमंती उपभोगणारी आणि सीईओसारख्या उच्चपदावर विराजमान असलेली ही व्यक्ती आता तुरुंगात आहे. (छायाचित्र पहा.) दोन पतींच्या गराड्यात अडकून खºया प्रेमापासून दूर गेलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या भविष्याबद्दल कुणीही सांगू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *