सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून अपघातात पाच जण ठार, तीन जखमी

पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याची माहिती आहे.  हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १० वाजता झाला.
माहितीनुसार, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर प्रवास करणाऱ्या या जीप मध्ये ८ प्रवासी हेते. मार्गात पुढचा टायर फुटल्याने गाडी उलटली आणि यावेळी पाच जणांचा दबून मृत्यू झाला. चार गंभीर जखमी झाली आहेत.

आमची भूमिका :
माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनामध्ये अनेकजण प्रवास करत होते. काहींनी यामागे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याचा तर्क जोडला. मात्र, यामागे दोन ते तीन कारणांचा दाखला देता येईल़ 1. मुळातच वाहनाच्या टायरमधील दाब वाढल्याने तो फुटला़ 2. घटनेपूर्वी वाहनाचा वेग अधिक असावा़ अर्थात चालकाचे त्यावर नियंत्रण नव्हते. 3. क्षमतेबाहेर प्रवाशी बसवून वाहनमालकाने वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केले आणि त्याचा परिणाम अपघात होण्यात झाला़. [ YOU MUST STOP ONE SECOND ]

एसटी बसेस बंद असणे, हे कारण तकलादू आहे़ कारण बसेस सुरू असतानाही वाहनचालक मालकांनी नियम मोडल्याने यापूर्वी जीवितहानी झालेली आहे़ त्यामुळे संबंधितांनी नियमांचे पालन केले असते तर हा अपघात नक्कीच टाळता आला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *