CINERANG : राजकुमार, मीना कुमारी आणि बरंच काही …

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

Abhivrutta Aanalysis And Research

पहिल्याच अपयशानंतर राजकुमारला चेहºयाबद्दल टोमणे देऊ लागले. काही जणांनी त्यांना खलनायक होण्याचा सल्ला दिला. १९५२ ते १९५७ पर्यंत राजकुमार आपले स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत राहिले. रंगीलीनंतर त्यांनी अनमोल सहारा, अवसर, घमंड, नीलमणी आणि कृष्ण-सुदामा यासारख्या चित्रपटात काम केले; परंतु यापैकी एकही चालला नाही.

भारतीय हिंदी चित्रपटक्षेत्रातील एक महान अभिनेते म्हणजे राजकुमार. त्यांची बोलण्याची स्टाईल आणि पायात नेहमी असणारे पांढरे बूट ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख. त्याकाळी राजकुमार यांचे नाव आपल्या अदाकारीने घायाळ करणाºया अभिनेत्री मीना कुमारी यांच्याशी जोडले गेले होते. ‘ट्रेजेडी क्वीन’ मीनाकुमारी आणि राजकुमार यांनी अनेक चित्रपट केले. राजकुमार यांनी ‘शाही बाजार’ चित्रपटातून अभिनेता म्हणून काम सुरू केले. शाही बाजारची निर्मिती होण्यास वेळ लागला. त्यावेळी राजकुमार यांना उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले होते. १९५२ साली ‘रंगिली’मध्ये लहानशी भूमिका साकारली. हा चित्रपट चित्रपटगृहात कधी आला आणि कधी गेला, हे समजलेच नाही. यादरम्यान, चित्रपट आला आणि सपाटूनआपटला.

मदर इंडियाने तारले
महबूब खान यांचा १९५७ मध्ये रिलीज झालेला चित्रपट मदर इंडियामध्ये राजकुमार एका गावातील छोट्या शेतकºयाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट पूर्णपणे अभिनेत्री नर्गिस यांच्यावर केंद्रित करण्यात आला होता; परंतु त्यातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यातीलअभिनयासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती देखील मिळाली. चित्रपटाच्या यशानंतर ते अभिनेता म्हणून इंडस्ट्रित सेटल झाले.

१९५९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट पैगाममध्ये अभिनय सम्राट दिलीप कुमार होते. त्यांच्यासोबत दमदार अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. त्यानंतर दिल अपना और प्रीत पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर आणि दूज का चाँद यासारखे त्यांनी चित्रपट केले. १९६५ मध्ये रिलीज झालेला चित्रपट काजलने त्यांना जबरदस्त यश मिळवून दिलं. त्यानंतर राजकुमार यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. बी. आर. चोप्रा यांचा १९६५ मध्ये आलेला चित्रपट वक्तमध्ये दमदार अभिनय करून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ‘वक्त’मधील त्यांचे संवाद लोकप्रिय झाले. ते संवाद असे होते , चिनाय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं वो दुसरों पे पत्थर नहीं फेंका करते. तसेच, चिनाय सेठ, ये छुरी बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकल आता है. वक्तनंतर राजकुमार यांनी हमराज, नीलकमल, दिल अपना और प्रीत पराई, मेरे हुजूर,हीर-रांझा आणि पाकिजामध्ये भूमिका केल्या.

मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर असा इतिहास रचला, ज्याला विसरणे कठीण आहे. बैजू बावरा चित्रपटामुळे मीना कुमारी स्टार झाल्या. त्यांची १९५१ मध्ये कमाल अमरोही यांच्याशी भेट झाली होती. त्याचदरम्यान, मीना कुमारी यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यावेळी कमाल यांनी मीना कुमारी यांची खूप काळजी घेतली. याचदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. बरेच दिवस त्यांनी आपलं लग्न लपवून ठेवले होते. नंतर दोघांत दुरावा निर्माण झाला आणि १९६४ मध्ये वेगळे झाले.

कमाल अमरोही यांचा चित्रपट ‘पाकिजा’ हा पूर्णपणे मीना कुमारीवर केंद्रित करण्यात आला होता. तरीही राजकुमार यांच्या अभिनयाने ‘पाकिजा’ चित्रपट ओळखला जाऊ लागला. राजकुमार यांना मीना कुमारी खूप आवडायच्या. मीना कुमारीसोबत एक सीन करताना पहिल्यांदा ज्यावेळी राजकुमार यांनी जवळून मीना कुमारी यांचे पाय पाहिले, त्यावेळी त्यांना मीना कुमारीच्या सौंदर्याने घायाळ केले होते. या चित्रपटात राजकुमार यांचा एक डायलॉग आहे. आपके पांव देखे, बहुत हसीन हैं. इन्हें जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जाएंगे… हा संवाद लोकप्रिय आहे.

राजकुमारांचा द्वेष
कमाल अमरोही राजकुमार यांच्यावर जळायचे. त्यांनी आपल्या चित्रपटात मीना कुमारी आणि राजकुमार यांचे कमी सीन्स शूट केले. चित्रपटातील एक गाणं खूपच रोमँटिक … ते चित्रित करणे खूप गरजेचे होते. कमालने मीना कुमारी यांच्या डोळ्यांतूनच प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सीनमध्ये दोघांना एकत्र न दाखवता रोमँटिक वातावरण आणि निसर्गावर अधिक फोकस केले होते. चलो दिलदार चलो, चांद के पार चलो…हे ते गाणे होते. पाकिजामधील हे गाणं खूप गाजले. त्यानंतर कमाल अमरोही यांनी राजकुमार यांना आपल्या कोणत्याही चित्रपटात घेतले नाही.

*****

(सर्व छायाचित्रे गुगलवरून साभार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *