केंद्र सरकार झुकले, तिन्ही कृषी कायदे मागे

राष्ट्रीय

नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनापुढे अखेर सरकार झुकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

मी देशवासियांची क्षमा मागत असून शेतकºयांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत. त्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. आपल्या सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य दिले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.

नोव्हेंबरअखेरीस सुरू होणाºया संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाले असल्याचे देशभरातील शेतकरीबांधवांनी म्हटले आहे.

CINERANG : राजकुमार, मीना कुमारी आणि बरंच काही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *