भारताला औषधी संशोधन आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्याची गरज

राष्ट्रीय

NEW DELHI : भारताला औषधी संशोधन आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पोषक परिसंस्था तयार करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ते औषधनिर्माण क्षेत्राच्या पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते.

केंद्र सरकार झुकले, तिन्ही कृषी कायदे मागे

औषध आणि लसींसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. २०१४ सालापासून आतापर्यंत देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्रात १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात भारताने सुमारे दीडशे देशांना जीवरक्षक औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला होता. शंभराहून जास्त देशांना कोविड प्रतिबंधक लसींचाही पुरवठा भारताने केला होता. आज भारताकडे औषध निर्माण क्षेत्राला प्रगतीपथावर नेऊ शकेल अशी उत्तम शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची फळी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *