संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

राजधानी मुंबई

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण वंदन केले आहे. तसेच, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व वीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *