प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

राजकारण

मुंबई, 22 नोव्हेंबर
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव [ DR PRADHNA RAJEEV SATAV ] यांच्या आमदारकीचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधान परिषद जागा रिक्त झाली होती. प्रज्ञा राजीव सातव यांच्यानंतर भाजपाकडून संजय केणेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले होते. आता केणेकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचे समजते.

दरम्यान, प्रज्ञा सातव यांचे पती तसेच काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्या पक्षात सक्रिय झाल्या आहेत़ सातव यांचा परिवार गांधी कुटुंबाशी जवळचा समजला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *