‘वॉक फॉर संविधान’ रॅलीला विभागीय आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी

उपराजधानी नागपूर

नागपूर : संविधान दिनानिमित्त येथील संविधान फाऊंडेशनच्यावतीने आज दीक्षाभूमी परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते संविधान चौकपर्यंत ‘वॉक फॉर संविधान’ [ WALK-FOR-SANVIDHAN-IN-NAGAPUR ] रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली.

संविधान फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, ‘सकाळ’चे संपादक संदीप भारंबे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ऍड. फिरदोस मिर्झा, डॉ. महेंद्र मेश्राम, ज्ञानेश्वर रक्षक आदी  उपस्थित होते.

भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘वॉक फॉर संविधान’ रॅली आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच, दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. फाऊंडेशनच्यावतीने श्रीमती लवंगारे-वर्मा यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *