अक्षय केळकर व उषा नाईक यांनी दिली ‘ऑरेंज सिटी’ नागपूरला भेट

उपराजधानी नागपूर सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

नागपूर : उच्‍चस्‍तरीय ड्रामा व अचंबित करणा-या ट्विस्‍ट्स असण्‍यासोबत सर्वसमावेशक कथानक असलेली कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘नीमा Denzongpa’ दर आठवड्याला प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

‘नीमा Denzongpa’चे (सुरभी दासने साकारलेली भूमिका) कथानक एका महिलेला सामना करावे लागणारे संघर्ष, अयोग्‍य टिप्‍पण्‍या व पूर्वाग्रहांना दाखवते. नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळाले की, नीमा तिच्‍या तीन मुलींच्‍या गरजा पूर्ण करण्‍यासोबत त्‍यांचे संगोपन करण्‍यासाठी आणि शिक्षण देण्‍यासाठी गोएंकाच्‍या घरामध्‍ये मोलकरीण म्‍हणून काम करू लागते. मुलगी सियाला (सुष्मिता सिंगने साकारलेली भूमिका) शिवच्‍या (चित्रांश राजने साकारलेली भूमिका) विवाहाबाबत समजते, जो तिचा प्रेमी होता आणि ती तिच्‍यापासून सत्‍य लपवून ठेवण्‍यासाठी तिच्‍या आईवर रागावते. याबाबत अधिक ड्रामाची भर करण्‍यासाठी तुलिका (शर्मिला शिंदेने साकारलेली भूमिका) व आई ऊर्फ सुनिता (उषा नाईकने साकारलेली भूमिका) त्‍यांच्‍यामध्‍ये दुरावा निर्माण करण्‍यासाठी योजना आखतात.

मालिकेमध्‍ये प्रमुख पात्राची भूमिका साकारताना दिसणारा अभिनेता अक्षय केळकर (जो सुरेशची भूमिका साकारत आहे) आणि दिग्‍गज अभिनेत्री उषा नाईक (ज्‍या आईची भूमिका साकारत आहेत) यांनी सुंदर नागपूर शहराला भेट देऊन मालिकेबाबत चर्चा केली आणि मालिकेला पाठिंबा देण्‍यासाठी चाहत्‍यांचे आभार मानले. शहरामध्‍ये असताना त्‍यांनी मालिकेच्‍या आगामी एपिसोड व प्रेक्षकांना अपेक्षित असलेल्या नवीन टिवस्‍ट्सबाबत सांगितले. त्यासोबत त्‍यांनी शहरातील काही आयकॉनिक स्‍थळांना भेट देखील दिली आणि स्‍थानिक पाककलांचा आस्‍वाद घेतला.

सुरेशची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्‍हणाला,”प्रेक्षक आमच्‍यावर सातत्‍याने प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आज आम्‍हाला नागपूरला भेट देऊन काही लोकांसोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याचा आनंद होत आहे. मालिका ‘नीमा Denzongpa’ची संकल्‍पना सुरेख आहे आणि माझ्या मते मालिकेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळण्‍याचे श्रेय या संकल्‍पनेलाच जाते. माझी भूमिका सुरेशमध्‍ये अनेक छटा आहेत आणि त्‍याचे आईसोबत दृढ नाते आहे. आमचे येथे जल्‍लोषात स्‍वागत करण्‍यात आले आणि येथील वातावरण अगदी घराच्‍यासारखेच होते.”

नागपूर भेटीबाबत  उषा नाईक म्‍हणाल्‍या,”नागपूर हे सुंदर शहर आहे आणि मला येथे भेट द्यायला आवडते. नागपूर हे माझ्या देशातील सर्वात आवडत्‍या शहरांपैकी एक आहे. मी नागपूरमध्‍ये अनेक रंगभूमी कार्यक्रम केले आहेत आणि माझ्या वाढीचे काही संस्‍मरणीय क्षण येथेच व्‍यतित केले आहे. यावेळी मी मालिकेमधील माझा मुलगा सुरेश (अक्षय केळकरने साकारलेली भूमिका) सोबत येथे आली आहे. आम्‍ही स्‍थानिक खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेण्‍यासाठी स्‍वत:वर ताबा ठेवू शकलो नाही. मला येथील फूड खूप आवडते. मालिकेमधील माझी भूमिका सुनितासाठी प्रेक्षकांकडून मिळत असलेल्‍या प्रतिसादाचा मला खूप आनंद होत आहे. ~पहा ‘नीमा Denzongpa’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्‍त कलर्सवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *