बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता : पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती

अमरावती : बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज काढले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती झोनचे अंचल प्रबंधक राहूल वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जितेंद्रकुमार झा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे, असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरुनच मास्क बनविणे, सॅनिटायझर तसेच खाद्य पदार्थ आदींची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे बचत गटातील महिलांचेही मनोबल वाढले. जागतिक बँकेनेही महिला बचत गटांच्या कार्याची नोंद घेतली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमुळे आज 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासनामार्फत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

या बातमीकडे दुर्लक्ष नको :

कॉलेज उमेदवारांसाठी कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार 

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका…

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा…

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *