नागपुरात किड, मिस्टर, मिस ग्लोबल इंडिया फॅशन वीक सौंदर्य स्पर्धा

उपराजधानी नागपूर

नागपूर : 4 डिसेंबर
ग्रँड फॅशन डिझायनर सप्ताह अंतर्गत ‘किड/मिस्टर/आणि मिस ग्लोबल इंडिया फॅशन वीक’ सौंदर्य स्पर्धा केएमसी लाँन येथे पार पडली. मागील 14 वर्षांपासून नागपुरात विविध फॅशन शो आयोजित करणारे फिरोज आलम हे कार्यक्रमाचे आयोजक होते.

प्रमुख पाहुणे महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय दुबे उपस्थित होते.

आयेशा सय्यद ही लहान मुलांच्या श्रेणीतील विजेती ठरली. प्रथम उपविजेता मोहम्मद मेराज खान, द्वितीय उपविजेता अल्हाज खान ठरला. यश कटरपवार हा एमआर श्रेणीत विजेता ठरला असून, पहिला उपविजेता देवेश कौशिक आणि द्वितीय उपविजेताचा सलमान याला मिळाला. मिस श्रेणीमध्ये आयुषी तालेवार विजेती ठरली. तसेच, प्रथम उपविजेती उर्विका आणि द्वितीय उपविजेती सोफिया सिंग ही ठरली.

 

याशिवाय राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी संस्थाने स्टेज सादर केलेले कौशल्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. फॅशन डिझायनर्स झेडए फॅशन, उत्कर्षा वाढोकर, प्रेशिता कहाळकर, प्राची आणि चैताली यांनी फॅशन डिझायनिंग बाजू सांभाळली.

शो डायरेक्टर आणि कोरिओग्राफर शान मिर्झा आणि हर्ष मिर्झा हे होते. तांत्रिक बाजू रॉबिन फ्रान्सिस यांनी सांभाळली. शाझिब, सोफियान, साहिल, रजत यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *