तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिळाला हा सन्मान, हरनाज कौर संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’

ब्युटी अँड फॅशन वर्ल्ड

MISS UNIVERSE 2021 : भारताने तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जागतिक सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून, पंजाबमधील हरनाज कौर संधू [ MISS UNIVERSE 2021 HARNAZ ] हिने 70 वा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे.

आज, सोमवारी सकाळी इस्रायलमधील इलात येथे 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात भारताची हरनाज कौर प्रथम क्रमांक मिळवून ‘मिस युनिव्हर्स 2021’ बनली आहे. यापूर्वी सुष्मिता सेन (1994) आणि 2000 मध्ये लारा दत्ता हिने ‘मिस युनिव्हर्स’ चा सन्मान मिळवला़ भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. हरनाजला मागील वर्षीची मिस युनिव्हर्स मेक्सिकोची अँड्रिया मेझा हिने मुकुट घातला.

या स्पर्धेत पॅराग्वेची 22 वर्षीय नादिया फरेरा ही दुसरी, तर दक्षिण आफ्रिकेची 24 वर्षीय लालेला मसवा हिने तिसरे विजेतेपद प्राप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *