जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

राजधानी मुंबई

मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 मान्यता मिळालेल्या योजना

अमरावती जिल्हा : 19 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता.चांदूरबाजार जि. अमरावती, नांदगाव पेठ व ३२ गावे प्रा. पा.पु. यो., ता. जि. अमरावती, तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पा.पु. यो. जि. अमरावती, १०५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,अमरावती

बुलडाणा जिल्हा : चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. खमगांव व ता. शेगांव, बुलढाणा, मौ. पाडळो व ५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बुलडाणा

महाराष्ट्र जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेस मान्यता मिळालेल्या योजना

अमरावती जिल्हा : मौ. काट आमला, ता. जि. अमरावती नळ पा. पु. योजना अमरावती, मौ.वडाळा नळ पा.पु. योजना, ता.वरूड, जि.अमरावती, मौ. टेंभर्णी नळ पा.पु. योजना, ता.चांदुररेल्वे, जि. अमरावती, मौ.तुळजापूर नळ पा. पु. योजना, ता. चांदुररेल्वे,जि. अमरावती, मौ. बहादरपुर नळ पा. पु. योजना, ता.भातकुली जि. अमरावती, मौ.खल्लार नळ पा.पु. योजना, ता. भातकुली, जि. अमरावती, मौ. भोपापुर नळ पा.पु. योजना, ता.अचलपूर,अमरावती,  मौ.बगदरी नळ पा.पु. योजना, ता. चिखलदरा, जि. अमरावती, मौ.बबईढाणा नळ पा.पु. योजना, ता.धारणी, जि.अमरावती, मौ.बागापूर नळ पा.पु. योजना, ता. चांदूररेल्वे, जि.अमरावती

भंडारा जिल्हा : मौ. घोडेझरी (सोनेगाव) नळ पा.पु. योजना, ता. लाखांदुर, जि. भंडारा, मौ.डोंगरदेव नळ पा.पु. योजना, ता.मोहाडी, जि.भंडारा, मौ.मेहगांव नळ पा.पु. योजना, ता.मोहाडी, जि.भंडारा

वर्धा जिल्हा : मौ.सेलू (कोल्ही) नळ पा.पु. योजना ता. हिंगणघाट, जि. वर्धा, मौ.कोल्ही नळ पा.पु. योजना ता.हिंगणघाट, जि.वर्धा

वाशिम जिल्हा : मौ.मोहजा इंगोले नळ पा.पु. योजना, मौ.पार्डी आसरा नळ पा.पु. योजना,  मौ.तपोवन व पुंजाजी नगर नळ पा.पु. योजना, मौ.मसोला बु.न.पा.पु. योजना, मौ.बांबर्डा न.पा.पु. योजना, मौ.शिंगणापूर नळ पा.पु. योजना, मौ. जानोरी नळ पा.पु. योजना, मौ. गिर्डी नळ पा.पु. योजना, वाशिम या 60 पाणीपुरवठा योजनेस उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *