गडचिरोली प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देणार, नुकसान भरपाई एक महिन्यात

राजधानी मुंबई

मुंबई : गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील सुरजगड प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, येथील खाणपट्ट्याचे काम सप्टेंबर 2021 पासून सुरु झालेले असून सुमारे 1500 स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. येथील काम नक्षलवादी कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात सुरु झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. या विषयांवर सदस्य नागोराव गाणार, गिरीश व्यास, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

भंडारा जिल्ह्यातील धान पीक नुकसान भरपाई एक महिन्यात देणार 

भंडारा  जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. ही मदत एक महिन्याच्या आत देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ. परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *