सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

राष्ट्रीय
  • निती आयोगाचा आरोग्य निर्देशांक जाहीर

नवी दिल्ली, 28 : आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी  नोंदवत महाराष्ट्राने  निती आयोगाच्या [ NITI AAYOG ] सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह  यापूर्वीच्या  निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे.  

आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने सोमवारी देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा ‘सर्वंकष आरोग्य निर्देशांक २०१९-२०’(चौथी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल आणि जागतिक बँकेच्या वरिष्ठ आरोग्य विशेषज्ञ शीना छाब्रा यांच्या उपस्थितीत ‘निरोगी राज्य, प्रगतीशील भारत अहवाल’ या शिर्षकाचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवाल प्रसिद्ध झाला

यापूर्वी 2018-19 च्या आरोग्य निर्देशांकात (तिसरी आवृत्ती) महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता. राज्याने सहाव्या स्थानाहून सुधारणा करत 2019-20 च्या आरोग्य निर्देशांकात (चौथी आवृत्ती)  पाचवे स्थान मिळविले आहे. जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने निती आयोगाने 2018-19 च्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात संकलीत माहितीच्या आधारावर गुणांकनासाठी  देशातील 19 मोठी राज्य,8 लहान राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेश अशी वर्गवारी करण्यात आली आहे. विविध तीन क्षेत्रांमध्ये एकूण २४ मानकांच्या आधारे 19 मोठ्या राज्यांमध्ये 100 पैकी 82.20 गुण मिळवून  केरळ  प्रथम स्थानावर कायम आहे तर 69.14 गुणांसह महाराष्ट्राने पाचवे स्थान मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *