नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर : डॉ. नितीन राऊत

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपुरातील शहरातील नागरिकांनी  नव्या कोरोना लाटेचे वाढते रुग्ण बघता कोणीही दोन्ही डोस घेतल्याशिवाय राहू नये, महाराष्ट्रामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे व नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरावे, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

मानकापूर क्रीडा संकुल येथून आज उत्तर नागपुरातील एकाच वेळी 38 कामाचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आदी उपस्थित होते. तसेच उत्तर नागपूर प्रभारी रत्नाकर जयपुरकर, कार्यालयीन सचिव लालाजी जयस्वाल, ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील, सचिन कोटांगळे, दीपक खोबरागडे, बालमुकुंद जनबंधू, मूलचंद मेहर, ललित कुमार बारसागडे आदी उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये विकासाचे हात सार्वजनिक असतात लोकांचे असतात आज तुमच्या हाताने तुमच्या भागातले विकास काम होत आहे. मी मात्र निमित्तमात्र असून या ठिकाणावरून ऑनलाइन आपल्याशी संवाद साधतो आहे, लोकशाहीची ही ओळख असून आज मतदार संघात एकाच वेळी अनेक ठिकाणच्या कामाचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन डॉ नितीन राऊत यांनी केले.

कोरोना पार्श्वभूमीवर अनेक विकास कामांना सुरू करता आले नाही. त्यामुळे कामे प्रलंबित आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात कामे सुरू करावीत, अशी इच्छा असताना पुन्हा एकदा शहर व राज्य तिसऱ्या लाटेच्या प्रारंभावर येऊन ठेपले आहे. अशावेळी एकमेकांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांनी  नव्या कोरोना लाटेचे वाढते रुग्ण बघता कोणीही दोन्ही डोस घेतल्याशिवाय राहू नये, महाराष्ट्रामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे व नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरावे, अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *