नागपूरवासीयांसाठी महत्त्वाची बातमी : ५०० वर्गफुटापर्यंतच्या मालमत्तांवरील कर माफ करण्याचा ठराव पारित

उपराजधानी नागपूर
  • कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय

 नागपूर : मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणा-या ५०० वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (ता.४) मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.

मंगळवारी कर आकारणी व कर संकलन समितीची विशेष बैठक समिती सभापतींच्या कक्षात घेण्यात आली. बैठकीत कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्य अनिल गेंडरे, संजय बुर्रेवार, सदस्या विशाखा मोहोड, शितल कामडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सकारने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौक फुट (४६.४६ चौरस मीटर) अंतर्गत रहिवासी मालमत्तेचे मालमत्ता कर माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरीबांच्या दृष्टीने हिताचा असून त्याची नागपूर शहरातही अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्व सदस्यांनी सर्वानुमते राज्य शासनाच्या निर्णयान्वये नागपूर शहरातील सुद्धा ५०० वर्ग फुट मालमत्तांचे मालमत्ता कर माफ व्हावे, असा ठराव पारित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *