पतंगबाजांवर धाड : नागपुरात मंगळवारी ६१५ प्लास्टिक पतंगे जप्त

उपराजधानी नागपूर
नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.४ जानेवारी ) प्लास्टिक पतंग विरोधात कारवाई करीत ६१५ प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत ११,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ५, धरमपेठ झोनमधील ७ आणि हनुमानगनर झोनमधील १५ पतंग दुकानांची तपासणी करुन ६१५ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ४४ दुकानांची तपासणी केली.

याशिवाय पथकाने ६ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३३,००० चा दंड वसूल केला. यामध्ये टेम्पल बाजार, सीताबर्डी येथील एस.आर.लिमिटेड लेबोरेटरीचासुध्दा समावेश आहे. सामान्य कच-यामध्ये जैविक (बायो मेडिकल) कचरा टाकण्यासाठी या लॅबवर रु. १ लक्ष चा दंड लावण्यात आला आहे. तसेच पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *