यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपुरातील ओबीसी उमेदवारांसाठी मोठी संधी

उपराजधानी नागपूर

नागपूर : ६ जानेवारी
नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांमधे ओबीसींच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार [ Minister Vijay Vadettiwar ] यांनी आज ट्वीट द्वारे यासंदर्भात माहिती दिली.

अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचं सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय १५ सप्टेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. त्यानुसार ३ जानेवारीला सुधारित बिंदुनामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *