राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

राजधानी मुंबई

मुंबई ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून अमरावतीसोलापूररायगडवर्धा आणि अहमदनगर आदी विविध भागातील पाणीपुरवठा योजनांच्या मान्यतेचे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरातमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आले.

 

पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडेराज्यमंत्री बच्चू कडूमाजी खासदार अनंत गुडेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजीव जयस्वालजलजीवन मिशन कक्षाचे संचालक डॉ. हृषिकेश यशोददिनेश बूब यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत संगमनेर तालुक्यातील मौजे निमगाव भोजापूर व इतर तीन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (22.46 कोटी)जवळे कडलग प्रादेशिक पाणीपुरवठा योजना(13.31 कोटी)वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम व गावे (32 कोटी)सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरमधील कॉ. गोदूताई परुळेकर नगर कुंभारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (22.17), अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील 156 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (23.68), चांदूरबाजार तालुक्यातील 105 गावे व भातुकली योजना (15.83), 19 गावे योजना (20.32) बागलिंगा व 14 गावे योजना (18.58), रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातीलस शहापाडा 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (25.88कोटी) रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *