शरद पवारांची मोठी गर्जना, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार

राजकारण

मुंबई : 11 जानेवारी
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, यापैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार [ SHARAD PAWAR ] यांनी केली आहे.
ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंजाब, उत्तराखंड, मणिपूर गोवा आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक [  FIVE STATE VIDHANSABHA ELECTION ]  होत आहे. यापैकी मणिपूर गोवा आणि उत्तरप्रदेश राज्यांत आपला पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि अन्य पक्षांबरोबर आघाडीने लढणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे सध्या चार आमदार असून, यावेळी त्यात एकने वाढ होणार आहे. गोव्यात कॉंग्रेस, तृणमूल आणि अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. उत्तरप्रदेशात पुढील आठवड्यात स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी

उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांची आघाडी झाली आहे. उद्या लखनौमध्ये या सर्व पक्षांची बैठक होणार असून, जागा वाटपाची घोषणा केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. यातून वास्तव समोर येईल, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *