देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १५३ कोटी मात्रांचा टप्पा पार

पीक शिवार

CORONA VACCINATION IN INDIA : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने आज १५३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५२ कोटी ८९ लाखांच्या वर गेली होती.

आज सकाळपासून सुमारे ८३ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची सुमारे १५३ कोटी ७४ लाख झाली आहे. राज्यात आज सकाळपासून ७ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १४ कोटी ८ लाख ८० हजारापेक्षा जास्त झाली आहे.

यात ५ कोटी ६८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. तर १ लाख ११ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक (तिसरी) मात्रा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *