टपोरी टुरकी …. Jocks for You …. अगदी निलाजरे आहात तुम्ही

टपोरी टुरकी ....Jocks for You

मन्या मनीले फोन करते. पुढं पाहा…
मन्या : जेवाले काय बनवतं?
मनी : तुम्ही सांगस्सान ते!
मन्या : कर की वरण,भात,रोटी
मनी : ते तं कालच केल्ती.
मन्या : बरं बेसण कर तव्यावर.
मनी : पोट्टे खात नायी
मन्या : वाटाण्याची चटणी कर
मनी : ते पचाले जड जाते
मन्या : आंडे कर…
मनी : काही वाटते कां, सोम्मार हायं आज!
मन्या : तुरीचे सोले हाये ना.
मनी : शेंगा नाही तोडून आणल्या.
मन्या : मंग मॅगी बनव.
मनी : हाट… ते का जेवण हाये?
मन्या : मंग काय बनवतं…?
मनी : तुम्ही सांगसान्नं तस्सं…

***

भरदुपारी मी एका गल्लीतून चाललो होतो तर पूर्ण गल्ली सुनसान होती.
.
मग मी पण जोरात आवाज दिला,
कांदे ५ रुपये किलो ऽऽऽ
.
अजून त्या गल्लीतील लोकं त्या कांद्यावाल्याला शोधत आहेत, असं माहित पडलं.

***

एक दिवस नवरा असलेला सुनिल घरात लाईटसचे काम करीत असतो. तेव्हा त्यानं बायको संगीताला मदतीला बोलावलं.
संगीता : काय आहे?
सुनिल : दोन वायरपैकी एक वायर जरा धर.
संगीता : हं धरली.
सुनिल : काही जाणवलं का?
संगीता : नाही.
सुनिल : अच्छा, म्हणजे करंट दुसºया वायरमध्ये आहे तर…

***

नामदेव मास्तर : काय रे बंट्या , शाळेची वेळ ७ वाजताची आहे आणि तू ८ वाजता येतो .
बंट्या : सर तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ. डायरेक्ट शिकवायला सुरुवात करत जा.

***

बाहेरील एक माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहीही अशक्य नाही,अशी कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. ‘टणक ऊ

Contact Form 1
स…’
हे नाव का ठेवले असेल? उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्यानं दाराच्या बाजूची बेल वाजवलीच.
एका म्हाताºयाने चेहºयावर आढ्या आणत दरवाजा उघडला.
‘‘काय्य हे दुपारी दुपारी…’’ म्हातारा खेकसला.
‘‘अहो ते… या बंगल्याचे नाव ‘टणक ऊस’ असं का ठेवलय ?’’
म्हातारा विस्कटलाच…
‘‘हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? ’’
‘माफ करा;पण राहवलं नाही. आणि आता झोपमोड तर सांगा ना ‘टणक ऊस’, हा काय प्रकार आहे?’’
चाचरत त्या माणसाने विचारलं.
‘‘अगदी निलाजरे आहात तुम्ही.’’
‘‘ हो तेही खरंच. ते ‘टणक ऊस’चं…
‘‘अहो…’’ म्हातारा पुन्हा बफरला.
‘‘अक्षर जुनी झाली की तुटून पडतात, हे सगळ्यांना माहिती आहे . हे ‘पाटणकर हाऊस’ आहे….

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *