नागपूरच्या मालविका बनसोडचे मोठे यश, भारतीय खुल्या बँडमिंटन स्पर्धेत साईना नेहवालला केले पराभूत

राष्ट्रीय

नागपूर : १३ जानेवारी
राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया फेरीत पी. व्ही सिंधू आणि एच. एस. प्रणोय यांनी एकेरी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केल आहे. मात्र, सायना नेहवाल ही आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू पराभूत झाली असून, तिचे या फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

नागपुरातील मालविका बनसोड हिने सायना नेहवाल हिला १७-२१, ९-२१ असे हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. पी. व्ही सिंधूने ईरा शर्माला पराभूत करत स्पर्धेची पुढची फेरी गाठली आहे. मिथुन मंजुनाथ याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने माघार घ्यावी लागल्यामुळं प्रणोय या बॅडमिंटनपटूला पुढील फेरीत प्रवेश मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *