Bikaner Guhawati Express derailed : बिकानेर-गोहाटी एक्स्प्रेसला भीषण अपघात , 6 डबे घसरले

राष्ट्रीय

Bikaner-Guhawati Express  derailed : पश्चिम बंगालमध्ये बिकानेर-गोहाटी एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला असून 6 ते 7 डबे रुळावरून घसरले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ही गाडी गोहाटीला पोहोचणे अपेक्षित होते.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनपासून पुढील 6 डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू केले.

 

आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला असून, 45 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही डबे दुसºया डब्यांवर चढल्याने यातील जखमी वा मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सरकारने मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत घोषित केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *