TAPORI TURAKI

टपोरी टुरकी …. Jocks for You … समजते हो मला!

टपोरी टुरकी ....Jocks for You

नोकरीसाठी मुलाखत सुरू होती. अर्थातच बेरोजगारीमुळे त्या कार्यालयासमोर लांबच लांब रांग लागली होती..
फाटकावर लिहिले होते, आत या. जो कमीत कमी शब्द बोलेल त्याला निश्चितच काम देण्यात येईल..
आपला क्रमांक येताच एकजण त्या खोलीच्या दारात उभा राहतो. मी आत येऊ का सर?
अर्थातच त्याला बाहेर जावे लागले.
दुसरा गेला आणि म्हणाला, मी येऊ का आत?
तोही बाहेर…
तेवढ्यात पुण्याच्या माणसाचा क्रमांक आला. त्याने आपली मान खोलीच्या धडकवली आणि म्हणाला, युका…

***

नागपुरातील एका घरातील चित्र असे होते…
बायको थालीपीठ बनविण्याच्या तयारीत… कांदा कापत असताना,
नवरा (पक्या) : हळू काप, हाताला लागेल.
काश्मिरा : समजते हो मला!
पक्या : अगं, त्या पिठात पाणी जास्त होतंय.
काश्मिरा : नाही. बरोबर आहे.
पक्या : गॅसची फ्लेम कमी ठेव.
काश्मिरा : काय कटकट आहे. समजते मला.
पक्या : बघ …बघ …करपतील थालीपीठ.
काश्मिरा (जरा चिडून ) : अहो करतेय बरोबर. मला समजते काय करायचे ?
पक्या : हो…हो.. मी गाडी चालवताना,अहो हळू. स्पीड कमी ठेवा..बघा समोर…तो पहा बाजूचा धडकेल… अहो, मागनं बस येतेय बरं का…अश तुझ्या सल्ल्याचा किती त्रास होत असेल मला. समजलं का?

***
दोघा नवरा बायकोत लयीच प्रेम होतं…
नूतन : माझ्यासाठी ताजमहाल बनवा.
.
.
.
.
संजय : साखर किती चमचे टाकू?

***

दिन्या मित्राला सांगतो,
हे बघ मन्या, माझ्यासोबत आई आणि बाबा दोघेही असतील. त्यामुळे तू जा, निकाल बघून ये…आणि हो, एक विषय गेला असेल तर ‘जय हरी’ म्हण, दोन विषय गेले असतील तर ‘जय हरी विठ्ठल’ म्हण…आणि तीन असतील तर ‘जय श्री राम’ असं काहीतरी म्हण.
दिन्या जातो आणि निकाल पाहून येतो.
तो आल्यावर…
दिन्या त्याला हळूच खुणावतो, काय झालं रे ?
त्यावर मन्या त्याचे पाय धरून म्हणतो,
…बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *